अहमदनगर: मानवी सांगड़ा आढळल्याने एकच खळबळ
Breaking News | Ahmednagar: अज्ञात मानवी शरीराचा सापळा आढळून आल्याने खळबळ.
जामखेड : जामखेड तालुक्यातील धामणगाव येथे अज्ञात मानवी शरीराचा सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सापळ्याच्या शेजारी लाल चौकड्या रंगाचा शर्ट, काळ्या कलरची पॅन्ट व काळसर जर्किन आढळून आले आहे. सचिन सदाशिव मंदिरे रा. धामणगाव हे शेळ्या चारण्यासाठी वनदरा धामणगाव डोंगर परिसरात गेले होते. दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी – जवळ जाऊन पाहिले. यावेळी त्यांना मानवाची कवटी व मानवी – शरीराचा सापळा दिसला. त्यांनी – धामणगावच्या सरपंचांना माहिती दिली.
सरपंचांनी खर्डा पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल संजय जायभाय, विष्णू आवारे, पंडित हंबर्डे, बाळासाहेब खाडे, गणेश बडे यांनी पाहणी करून सांगाडा ताब्यात घेतला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ४० असण्याचा अंदाज आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय झंजाड करत आहे.
Web Title: human skeleton was found and there was a sensation
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study