Breaking News | Ahmednagar: क्लासला जात असल्याचे सांगून बाहेर पडलेल्या दोन शाळकरी मुलींचे कोणीतरी अपहरण केल्याची घटना.
नगर : भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतून खळेवाडी येथून क्लासला जात असल्याचे सांगून बाहेर पडलेल्या दोन शाळकरी मुलींचे कोणीतरी अपहरण केले. ही घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अपहरण केलेल्या एका मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, शुक्रवारी दुपारी माझी मुलगी व तिची मैत्रीण दोषी क्लासला जात असल्याचे सांगून गेल्या.
त्या परत आल्या नाहीत. त्यांना कोणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. त्यातील एक मुलगी खळेवाडी (भिंगार) येथील असून, दुसरी मुलगी सैनिक नगर येथे राहत अमल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Kidnapping of two school girls
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study