संगमनेर: अल्पवयीन मुलीचे अपहरण, क्लासला गेली ते बेपत्ता
Breaking News | Sangamner: तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. शिवणक्लासला जाऊन येते’ असे सांगून गावात गेलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी परत आली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्यासंदर्भाने गेल्यावर्षी गुन्हा दाखल आहे. शोध घेऊनही मुलगी अद्याप सापडलेली नाही.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण होती. भागातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिवणक्लास करत होती. ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती ‘शिवणक्लासला जाउन येते’ असे घरी सांगून गेली होती. मात्र, ती घरी परतली नसल्याने तिच्या आईने त्यावेळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिचे अपहरण झाल्यासंदर्भाने गुन्हा नोंदवून घेतला. यानंतर शोध घेऊनही मुलगी अद्याप सापडलेली नाही. पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सहाणे अधिक तपास करत आहेत.
Web Title: Kidnapping of minor girl, missing after going to class
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study