Home पुणे धक्कादायक थरार, पतीने पत्नीला लॉजवर नेले अन्… मग मद्याच्या नशेत…

धक्कादायक थरार, पतीने पत्नीला लॉजवर नेले अन्… मग मद्याच्या नशेत…

Breaking News | Pune Crime: पतीकडून पत्नीला लॉजवर नेऊन चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना.

Shocking that the husband took his wife to the lodge and stabbed her to death

पुणे: पतीकडून पत्नीला लॉजवर नेऊन चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,  काजल आणि कृष्णा यांच्यामध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. या दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. त्यामुळे कृष्णाने काजल हिला चर्चेसाठी बोलवले होते. शनिवारी दुपारी ते अश्विनी लॉजमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी मद्यपान केला. मद्याच्या नशेमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर कृष्णाने काजलवर चाकूने वार करत तिचा खून केला. त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला.

कृष्णाने एका मित्रांसोबत मद्य प्राशन केले. त्यावेळी त्याने मित्राला सांगितले की त्याने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. मित्राला हे कळताच ते घाबरले. त्यांनी थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ लॉजवर धाव घेतली आणि मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी आरोपी कृष्णा कदम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याने लॉजवर नेऊन काजलचा खून केल्याचे सांगितले. आरोपीने खून कशासाठी केला हे मात्र अद्याप समोर आले नाही.

Web Title: Shocking that the husband took his wife to the lodge and stabbed her to death

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here