Home अकोले अहमदनगर: दरोड्याच्या तयारीतील संगमनेर-अकोलेची टोळी जेरबंद

अहमदनगर: दरोड्याच्या तयारीतील संगमनेर-अकोलेची टोळी जेरबंद

Breaking News | Ahmednagar: दरोडाच्या तयारीत असलेले चार जण स्थानिक गुन्हे शाखेने नगर-मनमाड बायपास रोडवर जेरबंद.

Gang of Sangamner-Akole in preparation for robbery jailed

अहमदनगर: दरोडाच्या तयारीत असलेले चार जण स्थानिक गुन्हे शाखेने नगर-मनमाड बायपास रोडवर जेरबंद केले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पथकाने ही कारवाई केली. आरोपींमध्ये संगमनेर आणि अकोले तालुक्यातील समावेश आहे. त्यांच्याकडून 1 लाख 92 हजारांचा मुद्देमाल आणि हत्यार हस्तगत करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरिक्षक आहेर यांनाबातमीदारा मार्फत माहिती मिळाली, प्रज्वल देशमुख (रा. जवळे कडलग, ता. संगमनेर) हा त्याच्या 4 ते 5 साथीदारांसह 2 मोटार सायकलवर येवुन नगर-मनमाड बायपास रोडवरील साईबनकडे जाणार्‍या रोडलगत दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरुन बसलेले आहेत.

पोलीस निरिक्षक आहेर यांच्या सूचनेवरून पथकाने नगर-मनमाड रोडवरील बायपास रोडवर जावून खात्री करता अंधारात रोडच्या कडेला, काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले. पथक संशयीतांना पकडण्याच्या तयारीत असतांना, त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळून जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन 4 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी 1 जण अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या संशयीतांनी त्यांची नावे प्रज्वल देशमुख (रा. जवळे कडलग, ता. संगमनेर,) अशोक रघुनाथ गोडे (वय 24), भरत लक्ष्मण गोडे (वय 25, दोन्ही रा. तिरडे, ता. अकोले) व सुयोग अशोक दवंगे (वय 20,रा. हिवरगांव पावसा, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या संशयीत इसमांचे नाव विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे अक्षय काळे (रा. सुरेगाव, ता. नगर) असे असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पथकाने अंगझडती घेता त्यांच्या ताब्यात असणारी 1 तलवार, 1 दांडके, मिरची पुड, नायलॉन रस्सी, 1 पल्सर व 1 प्लॅटीना मोटार सायकल असा 1 लाख 92 हजार 100 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत लक्ष्मण गोडे हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द घरफोडी व चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Gang of Sangamner-Akole in preparation for robbery jailed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here