याचीबायको पळाली त्याने मित्राची बायको पळवली !
Breaking News | Jalgaon: पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर विरहाचे दुःख विसरण्याचे प्रयत्न करणाऱ्याने पुणे येथील मित्राच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.
जामनेर | जळगाव : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर विरहाचे दुःख विसरण्याचे प्रयत्न करणाऱ्याने पुणे येथील मित्राच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. दोन मुलासह तिला शोधत पतीने सोबत यायची विनंती केली. मुलेही आईला बिलगली, रडू लागली. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले परंतु प्रेमात बुडालेल्या आईला कसलाच पाझर फुटला नाही.
तालुक्यातील एका गावातील इसमाची पत्नी दोन तीन महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती. आपणास प्रियकरासोबतच राहायचे असल्याचे तिने सांगितल्याने पोलिसही चक्रावले.
काही दिवस गावाकडे राहून हा इसम कामधंद्याच्या शोधासाठी पुणे येथे पोहोचला. पुण्यात ओळखीच्या एका मित्राच्या मदतीने त्याला काम मिळाले. त्याचे मित्राच्या घरी येणे- जाणे वाढले. यातून या मित्राच्या पत्नीशीच त्याचे प्रेम जुळले. दोघांनी मग संधी साधून पुण्यातून पळ काढला.
Web Title: His wife ran away He ran away his friend’s wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study