Home अहमदनगर अहमदनगर:  रस्त्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर:  रस्त्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला

Breaking News | Ahmednagar: तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला केला, तीन जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

Ahmednagar young man was attacked with a knife on the street

नगर : आमच्या भांडणात पडू नको असे म्हणून तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला केला. ही घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध अॅट्रासिटीसह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

जहीर ईक्रम सय्यद, लैला जहीर सय्यद व एका अनोखळी व्यक्तीचा आरोपीमध्ये समावेश आहे. अभिषेक बाळासाहेब नवगिरे (वय २३, रा. केडगाव, नगर) यांनी जखमी असून, त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दिवसभराचे काम आटोपून घरी जात असताना जहीर सय्यद व लैला सय्यद समोर आले. जहीरच्या हातात कोयता होता. तो

म्हणाला तु आमच्या भांडणात पडायचे नाही. मी तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून कोयत्याने हल्ला केला. जातिवाचक शिवीगाळ केली. नागरिक सोडविण्यासाठी आले असता आरोपी पळून गेले.

Web Title: Ahmednagar young man was attacked with a knife on the street

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here