सावधान! नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू, आतापर्यंत आठ जण दगावले
Breaking News | Nashik: स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर.
नाशिक : स्वाईन फ्लूमध्ये नाशिककरांची चिंता वाढली आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये शहरातील 50 वर्षीय पुरूष तर दिंडोरीतील 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे नाशिकमधील स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर गेली असून आतापर्यंत शहरातील 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. नाशिक शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
गेल्याच आठवड्यात नाशिकमधील जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूनंतर रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दिंडोरीतील 42 वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचे निधन झाले.
आता नाशिकमधील स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. यामुळे मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आली असून इतर स्वाईन फ्लूच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title: Two died due to swine flu in Nashik
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study