Home गडचिरोली समाजसुन्न! कुऱ्हाडीने पत्नीचे शीर केले धडावेगळे

समाजसुन्न! कुऱ्हाडीने पत्नीचे शीर केले धडावेगळे

Breaking News | Crime: झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची निघृण खून करण्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला.

The ax beheaded his wife murder

गडचिरोली: झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची निघृण खून करण्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.  येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे मंगळवार (ता. २८) रात्री ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

विशेष म्हणजे त्याने ५ वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत हे भयंकर कृत्य केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. मृत महिलेचे नाव अमरोतीन बंझार असून आरोपी पती रोहिदास बंझार याला पोलिसांनी अटक केली आहे. रोहिदास बंझार (वय ३८) यांचे अमरोतीन बंझार (वय ३३) हिच्याशी २००९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना ४ मुली असून नवव्या वर्गात असलेली सर्वात मोठी मुलगी ही घटनेच्या वेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती.

मंगळवार रात्री मधल्या दोन मुली आपल्या आजीकडे झोपल्या होत्या, तर लहान मुलगी आईबाबांसोबत झोपली होती. रात्री ३ वाजताच्या सुमारास रोहिदासने कुठला तरी राग मनात धरून पत्नी अमरोतीनच्या मानेवर झोपेतच कुन्हाडीने तीन वेळा वार करून ठार केले. हा सारा थरार सोबत झोपलेल्या चिमुकलीसमोरच घडला.

अमरोतीनला ठार केल्यानंतर आरोपी रोहिदासने कुन्हाड लपविली. ती कुन्हाड कुठे लपविली हे लहान मुलीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी आरोपी रोहिदासला अटक केली असून पुढील तपास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आईचा निघृणपणे खून करून आता क्रूर बापही कारावासात गेल्याने या दाम्पत्यर्ग्यूच्या चार निरागस मुली मात्र अनाथ झाल्या आहेत.

आरोपी रोहिदासला संतापाच्या भरात मारहाण करण्याची सवय होती, अशी चर्चा आहे. त्याचा पत्नी अमरोतीनसोबत यापूर्वीसुद्धा वाद झाला आहे. रोहिदास हा पत्नी अमरोतीनला मारझोड करतो म्हणून ४ वर्षांपूर्वी बेतकाठी येथे गावात बैठक घेऊन त्याची समजूतही काढण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी आरोपी रोहिदास बोअरचे काम करण्याकरिता दुसऱ्या जिल्ह्यात गेला होता. तिथे त्याने आपल्या मालकालासुद्धा मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: The ax beheaded his wife murder

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here