खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला
राहता: पैठण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पैठण पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना राहता येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली सविस्तर माहिती अशी की, आरोपी गोरख विठ्ठल लोखंडे वय ३६ चारी राहता हा पैठण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक होता. तपासासाठी त्याला पोलीस उपनिरीक्षक संतोष महादेव माने(पैठण पोलीस ठाणे) व त्यांचे सहकारी राहता येथे घेऊन आले होते. यावेळी लोखंडे याने दिलेल्या निवेदानाप्रमाणे हत्याराचा जप्ती पंचनामा करत असताना गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड तो काढून देत होता. यादरम्यान लोखंडे याने त्याच कुऱ्हाडीने पोलीस अधिकारी व कर्मचारी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले व शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी उप निरीक्षक माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोरख लोखंडे यांच्याविरुद्ध राहता पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक आवारे करीत आहे.
Website Title: Latest News murder attacked police with an ax