अहमदनगर: तरुणाची विषारी औषध घेऊन आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या.
राहुरी : तालुक्यातील ताहाराबाद येथील नितीन नानासाहेब विधाटे (वय २४) या विवाहित तरुणाने रविवारी (दि. १९) रात्रीच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रामनाथ सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.
नितीनच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, वडील, सहा बहिणी असा मोठा परिवार आहे. नितीन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. नितीन याला सहा बहिणी असून, सहा बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता. नितीन याने नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे समजू शकले नाही. या घटनेने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
Web Title: Married youth commits suicide by taking poisonous medicine
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study