Home अहमदनगर वडिलांनी मोबाईल न घेतल्याने युवकाची आत्महत्या

वडिलांनी मोबाईल न घेतल्याने युवकाची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना.

youth commits suicide because his father did not take his mobile phone

जामखेड: महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील नायगाव येथे घडली.

गजानन रामदास उगले (२३, रा. नायगाव, ता. जामखेड) असे मयत मुलाचे नाव आहे. उपचारादरम्यान गजानन याचा तब्बल २३ दिवसांनी जामखेड येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मयत गजानन रामदास उगले याचे वडील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल याठिकाणी शिक्षक आहेत. गजानन याने वडीलांकडे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र ते पैसे न दिल्याच्या रागातून गजानन उगले याने मागिल महिन्यात २८ एप्रिल २०२४ म्हणजे २३ दिवसांपूर्वी विषारी पदार्थ सेवन केला होता. यानंतर त्याच्यावर २३ दिवसां पासून जामखेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

गजानन याच्या तब्येतीमध्ये हळुहळु सुधारणा होत होती. तसेच त्याला दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात देखील येणार होते. मात्र शनिवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटना खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याने सदरची नोंद खर्डा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: youth commits suicide because his father did not take his mobile phone

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here