Home नाशिक मुख्याध्यापकासह शिक्षकाला लाच घेताना अटक

मुख्याध्यापकासह शिक्षकाला लाच घेताना अटक

Nashik Crime Teacher along with Principal arrested for taking bribe: १० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेतला. यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक.

Teacher along with principal arrested for accepting bribe

नाशिक: श्रमिकनगर येथे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इमारती निधीच्या नावाखाली १० हजारांची लाच स्वीकारताना शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्रमिकनगरमधील श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात सदरची कारवाई शनिवारी (ता. ११) दुपारी केली. (सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (५६), दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (५७) असे श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या लाचखोर मुख्याध्यापक व उपशिक्षकाचे नाव आहे.

तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, त्यांनी दोन मुले सातपूरमधील महापालिकेच्या शाळेमध्ये मराठी माध्यमात सातवीच्या वर्गात शिकत आहेत. परंतु तक्रारदार हे मूळचे बिहारचे असल्याने ते हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचणी येत होत्या. हिंदी माध्यमाच्या श्रमिकनगरमधील श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात त्यांच्या मुलांसाठी प्रवेश घ्यायचा होता.

त्यासाठी त्यांनी गेल्या २९ एप्रिल रोजी शाळेचे मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांना भेटून मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी भेटले. त्यावेळी मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी दोन मुलांसाठी प्रत्येकी ८ हजार रुपये याप्रमाणे, १६ हजार रुपये इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली. मात्र या निधीची कोणतीही पावती मिळणार नसल्याचेही सांगितले होते.

तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, विभागाने पडताळणी केली. त्यानुसार, तक्रारदार हे शनिवारी (ता. ११) पुन्हा गुप्ता हिंदी माध्यमिक शाळेत मुलांच्या प्रवेशासंदर्भात भेटले. त्यावेळी लाचखोर मुख्याध्यापक व शिक्षकाने पंचासमक्ष इमारत निधीच्या नावाखाली १० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेतला. यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली.

Web Title: Teacher along with principal arrested for accepting bribe

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here