संगमनेर: त्या तरुणी विवाहितेचा खून झाल्याचे उघडकीस
Breaking News | Sangamner: विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर, शवविच्छेदन अहवालातून मृत्यूपूर्वी विवाहितेला बेदम मारहाण, पतीसह सासूवर संगमनेर तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल.
संगमनेर: तालुक्यातील मिर्झापूर येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. परंतु, शवविच्छेदन अहवालातून मृत्यूपूर्वी विवाहितेला बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाल्याने संगमनेर तालुका पोलिसांनी पती आणि सासूवर खुनाचे वाढीव कलम लावले आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सायली अविनाश वलवे हिचा मिर्झापूर येथील अविनाश निवृत्ती वलवे याच्यासोबत विवाह झाला होता. त्यानंतर सासू सुभद्रा निवृत्ती वलवे आणि पती अविनाश वलवे हे आई-वडिलांकडून ट्रॅक्टरचे औजारे घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ करत होते. तिने ही मागणी पूर्ण न केल्याने पती अविनाशने चापटीने मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तर सासू स्वयंपाक चांगला येत नाही, लोकांमध्ये चांगली वागत नाही असे हिणवायची. याबाबत सासू सतत तिच्या मुलाला सांगायची. मग पती अविनाश तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करायचा. अखेर याला वैतागून तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवले होते. परंतु, तिच्या शरीरावर जखमा होत्या. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे लोणी किंवा घाटी येथे शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार लोणीच्या पथकाने शवविच्छेदन करून अहवाल दिल्याने त्यात हत्या झाल्याचे उघड झाले. यावरून तालुका पोलिसांनी पती व सासूवर खुनाचे वाढीव कलम लावून दोघांनाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Web Title: revealed that the young married woman was murdered
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study