उद्यापासून तीव्र उष्णतेची लाट, ‘यलो अलर्ट, सावधानतेचा इशारा
Breaking News | heat wave: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला सावधानतेचा इशारा.
पुणे : संपूर्ण देशात १ ते ५ मे या कालावधीत उष्णतेची लाट सर्वाधिक तीव्र होत असून पारा ४४ ते ४५ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. राज्यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ७ मेनंतर मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
एक मेपासून देशातील सर्वच भागांत उष्णतेची लाट तीव्र होत असून यंदाच्या हंगामातील ही शेवटची तीव्र लाट ठरू शकते. ७
मेपासून पुन्हा वातावरणात बदल होत असून ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर वळवाच्या पावसाचे वेध लागतात. १ ते ५ मे या कालावधीत दक्षिण भारतात तीव्रता सर्वाधिक राहणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि उपक्षेत्रात उष्णतेची लाट तीव्र राहील. रायलसीमा, कोकण, अंतर्गत कर्नाटक आणि केरळ या भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती तीव्र ते अतितीव्र राहील.
सोमवारचे राज्याचे कमाल तापमान
सोलापूर ४३.७, मुंबई ३४.४, पुणे ४१.८, जळगाव ४२.२, कोल्हापूर ४०.२, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४२, नाशिक ४१.२, सांगली ४१, सातारा ४०.५, सोलापूर ४३.७, छत्रपती संभाजीनगर ४०.७, परभणी ४२.८, नांदेड ४२.४, बीड, अकोला ४१.३, अमरावती ३९.२, बुलडाणा ३९.१, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४१.८, गोंदिया ३३.८, नागपूर ३७.४, वाशिम ४१.८, वर्धा ३९, यवतमाळ ४१.५.
७ मेनंतर पावसाचा अंदाज
मे महिन्यात पहिले पाच दिवस अतितीव्र उष्णतेची लाट राहील. त्यानंतर ७ मेपासून देशाच्या काही भागांत पावसाला सुरुवात होईल. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, चंदीगड, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, दक्षिण ओडिशा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, माहे आणि लक्षद्वीप या भागांत पावसाचा अंदाज आहे. पुढील सात दिवसांत केरळ आणि माहेमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे
मे महिना उष्ण रात्रींचा
मेच्या सुरुवातीलाच कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान प्रखर राहील; शिवाय या काळात रात्रीचे तापमान ३० अंशांपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे बाहेर पडताना सावध राहा. सुती कपडे वापरा, भरपूर पाणी प्या, असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
Web Title: Severe heat wave from tomorrow
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study