Home जळगाव केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट; दोन ठार, २२ कामगार भाजले, ५ जण गंभीर

केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट; दोन ठार, २२ कामगार भाजले, ५ जण गंभीर

Breaking News | Jalgaon: बॉयलरचा स्फोट होऊन अग्नितांडवात दोन कामगाराचा भाजून मृत्यू झाला, तर २२ कामगार होरपळले.

Boiler Explosion at Chemical Company two killed

जळगाव : एमआयडीसीतील मोरया केमिकल कंपनीत बुधवारी सकाळी ९:१५ वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमुळे बॉयलरचा स्फोट होऊन अग्नितांडवात दोन कामगाराचा भाजून मृत्यू झाला, तर २२ कामगार होरपळले. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याचे हादरे २ ते ३ किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले. अनेक घरांच्या खिडक्यादेखील यामध्ये फुटल्या.

जळगावमधील केमिकल कंपनीत शॉर्टसर्कीटने स्फोट झाल्यावर भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दूरवरपर्यंत धुराचे लोट दिसत होते.

काय आहेत आगीची कारणं..?

■ कंपनीतील सुरक्षा रक्षक व कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

■ कंपनीत क्षमतेपेक्षा अधिकचा कच्च्या मालाचा साठा या ठिकाणी ठेवण्यात आल्याने हा स्फोट झाला असावा, किंवा तापमानवाढीमुळे रसायनाने पेट घेतल्याने स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Web Title: Boiler Explosion at Chemical Company two killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here