संगमनेरात हेरॉईन, गांजा जप्त, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Breaking News | Sangamner: ३६ ग्रॅम हेरॉईन, साडेचार किलो गांजा आणि ४ लाख १५० रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. (Heroin, ganja seized)
संगमनेर : शहरातील शिवाजीनगर (मालदाड रस्ता) परिसरात पोलिसांनी सोमवारी (दि.१) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई करत ३६ ग्रॅम हेरॉईन, साडेचार किलो गांजा आणि ४ लाख १५० रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी तेथे कारवाई करत ४४ हजार ९८० रुपये किमतीचा ४ किलो ४९८ ग्रॅम गांजा, ७२ हजार रुपये किमतीचे हेरॉईन (गर्द) आणि ४ लाख १५० रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल शहर पोलिस ठाण्यात आणला.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. संगमनेरात हेरॉईनसह गांजा विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेरात पोहोचले. या पथकासोबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांचे पथक हेरॉईन आणि गांजाची विक्री होत असलेल्या ठिकाणी पोहोचले.
Web Title: Heroin, ganja seized, valuables worth 5 lakh seized in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study