संगमनेर: मालवाहू टेम्पो उलटला; एक ठार, एक जखमी
Breaking News | Sangamner Accident: चालकाचा ताबा सुटल्याने मालवाहू टेम्पो महामार्गाच्या कडेला उलटला. यामध्ये एक ठार तर एकजण जखमी.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डोळासणे येथे शुक्रवार दि. २९ मार्च रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने मालवाहू टेम्पो महामार्गाच्या कडेला उलटला. यामध्ये एक ठार तर एकजण जखमी झाला आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की डोळासणे शिवारातील नाशिक- पुणे महामार्गावर हॉटेल साई एकविराच्या पुढे दोनशे मीटर अंतरावर मालवाहू टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गाच्या कडेला उलटला. यामध्ये चालक वेदप्रकाश अमरचंद पापडेजा (वय ६५) हे किरकोळ जखमी झाले तर
टेम्पोतील हमाल भास्कर डंगाळे (वय ६०) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती समजताच डोळासणे वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनला पाचारण करून अपघातग्रस्त मालवाहू टेम्पो महामार्गावरुन बाजूला घेण्यात आला. अधिक तपास घारगाव पोलीस करत आहेत.
Web Title: Freight tempo reversed Accident One killed, one injured
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study