Home अहमदनगर अजित पवारांना मोठा धक्का! निलेश लंकेंनी दिला आमदारकीचा राजीनामा, दादा मला….

अजित पवारांना मोठा धक्का! निलेश लंकेंनी दिला आमदारकीचा राजीनामा, दादा मला….

Loksabha Election 2024: निलेश लंके यांनी आमदारीचा राजीनामा दिला, निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Loksabha Election 2024 Nilesh Lanke resigned from MLA

MLA Nilesh Lanke: लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांनी आमदारीचा राजीनामा दिला आहे. दक्षिण नगरमधून भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात निलेश लंके निवडणूल लढवणार आहेत. निलेश लंके शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी खासदारकी लढवण्याची घोषणा केली तेव्हापासून अजित पवार लंकेंवर नाराज आहेत.

मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, पण आपल्याला  लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागण र आहे. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तेव्हापासून अहमदनगरची जागा खूप चर्चेत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात लढत होणार आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात नीलेश लंके यांच्या पत्नीही सक्रिय दिसत आहेत.

राजीनामा देताना निलेश लंके यांना अश्रू अनावर झाले. आपल्याला लोकसभा लढवायची असेल तर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे लंके म्हणाले. यावेळी त्यांच्या भावनांचा बांध फुटला. ते म्हणाले आपल्याला रडायचं नाही लढायचं आहे. मी विधावसभा अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा पाठवत आहे.

Web Title: Loksabha Election 2024 Nilesh Lanke resigned from MLA

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here