Home महाराष्ट्र शारीरिक संबंध ठेवण्यास नकार चक्क गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार चक्क गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार

Breaking News | Solapur Crime: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका व्यक्तीचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Refusal to have physical relations is a shocking form of genital mutilation

सोलापूर: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका व्यक्तीचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी) तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्यात  दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित महिलेस अटक (Arrested) करून न्यायालयात हजर केले असता या महिलेस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे मोबाइलचे दुकान आहे. तर यातील संशयित आरोपी महिला या दुकानात कायम येत-जात असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली आणि कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. नंतर त्या महिलेने युवकाकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र महिला आधीच विवाहित असल्याने युवकाने लग्नासाठी नकार दिला. मात्र, संशयित आरोपी महिला ही ब्लॅकमेल करू लागली. त्यातूनच मार्च 2023 मध्ये त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला. या प्रकरणात युवकाला तुरुंगात जावे लागले. जवळपास दोन महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतरही तिचे ब्लॅकमेलिंग सुरूच राहिले. दरम्यान, त्याच्या वडिलांवर आणि भावांवर देखील छेडछाडीचे गुन्हे दाखल केले.

शेवटी या महिलेच्या त्रासाला कंटाळून ऑगस्ट 2023 मध्ये युवकाने आळंदी येथे तीच्यासोबत लग्न केले. मात्र त्यानंतरही ती महिला या युवकाजवळ न राहता त्याचा छळ करतच राहिली, त्याच्याजवळ राहत नसतानाही मोबाइलद्वारे आणि दुकानात जाऊन ही महिला त्याला त्रास देऊ लागली. तिच्या त्रासाला वैतागून युवकाने आपले राहते घर सोडून 3 महिन्यांपूर्वी तो बार्शी तालुक्यात नातेवाइकाकडे राहण्यास गेला. तेव्हापासुन दोघातील संपर्क तुटला होता.

दरम्यान गुरुवार 21 मार्च 2024 रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास या महिलेने समाज माध्यमावरील अकाउंटवरून युवकाला फोन केला. त्याला धमकी देत गुरुवारी दुपारी 2. 30 वाजता बार्शी एस.टी. स्टॅन्डवर भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते दोघेही तेथीलच साई समर्थ लॉज येथे गेले. तेथे गेल्यावर महिलेने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने नकार दिला, तरीही महिलेने बळजबरी त्याचे कपडे काढले. तोंडावर शर्ट टाकून अचानकपणे गुप्तांगवर चाकूने वार केले.

अचानक झालेल्या हल्याने युवकाला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतं असल्याने युवकाने बार्शीतील खासगी रुग्णालय गाठले. या प्रकरणी जखमी युवकाने पोलिसात देलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महिलेविरोधात हत्येच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास बार्शी पोलीस करीत आहेत.

Web Title: Refusal to have physical relations is a shocking form of genital mutilation

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here