Home अहमदनगर अहमदनगर: अंघोळ करणाऱ्या महिलेचा व्हिडियो काढला

अहमदनगर: अंघोळ करणाऱ्या महिलेचा व्हिडियो काढला

Breaking News | Ahmednagar Crime: महात्मा फुले कृषी विद्यापीठात महिलेची छेड काढल्याने अभियंता विभागातील स्थापत्य मिस्तरीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ.

video of a woman taking a bath

राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठात महिलेची छेड काढल्याने अभियंता विभागातील स्थापत्य मिस्तरीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या शेतकरी महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गणेश तुकाराम चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या मिस्तरीचे नाव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ नेहमीच कोणत्या न कोणत्या वादामुळे चर्चेत असते. विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून त्यात महिला शेतकरी आहेत. प्रशिक्षणासाठी आलेल्या शेतकऱ्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी (दि.२०) सकाळी शेतकरी महिला आंघोळीसाठी गेली असता गणेश चौधरी याने खिडकीतून मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. घडलेल्या प्रकाराने शेतकरी महिलेने संताप व्यक्त करत वरिष्ठांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

शेतकरी महिलेने थेट राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्यामध्ये स्थापत्य मिस्तरी चौधरी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A video of a woman taking a bath was taken Crime filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here