राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
अहमदनगर : राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी असा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील अनेक भागांत तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. गुजरात राज्याच्या सौराष्ट्र व कच्छ भागात उष्णतेची लाट आली आहे. राज्यात शुक्रवारी उच्चांकी कमाल तापमान विदर्भात अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंद झालेली आहे. पुणे ३७.३, नगरला ३६, , औरंगाबाद ३७.६ , जळगाव ४०, अशी तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पाउस होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Website Title: Latest News Rain with thunderstorm in whole state