संगमनेर: अमित पंडितला ७ दिवस पोलिस कोठडी
Breaking News | Sangamner: नगर अर्बन बँक घोटाळ्यात सहभागप्रकरणी तपास सुरू.
संगमनेर: नगर अर्बन बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शनिवारी अटक करण्यात आलेल्या अमृतवाहिनी बँकेचा समाजी अध्यक्ष अमित पंडित याला नी न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस कोठडीत ना पंडितकडून नेमकी काय माहिती समोर बर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर अर्बन बँकेतील महाघोटाळा प्रकरणात बँक बुडविण्यास कारणीभूत नी ठरल्याचा आरोप असलेल्या १०५ आरोपींपैकी एक असलेल्या संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित याने घेतलेल्या कर्जाची रक्कम पंचवीस कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अशा बड्या कर्जदारांविरुद्ध फास आवळण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते. शनिवारी दुपारी बँकेला फसविल्याच्या आरोपावरून या बड्या कर्जदाराला संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते.
आर्थिक गुन्हे शाखेने नगर अर्बन बँक महाघोटाळा प्रकरणी अटक केलेल्या अमित वल्लभराय पंडित याला रविवारी (दि. १७) अहमदनगर येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पंडित याची रवानगी २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. एका उद्योजकाला व राजकीय पाठबळ असलेल्या बड्या नेत्याला अटक करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
Web Title: Amit Pandit in police custody for 7 days
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study