Home संगमनेर संगमनेर: जोर्वेत दोघांना बेदम मारहाण

संगमनेर: जोर्वेत दोघांना बेदम मारहाण

Breaking News | Sangamner Crime: व्याजाचे पैसे मिळण्यासाठी जोर्वे येथील खासगी सावकाराने व त्याच्या कुटुंबाने दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना.

Sangamner Crime Jorvet, two were severely beaten

संगमनेर: व्याजाचे पैसे मिळण्यासाठी जोर्वे येथील खासगी सावकाराने व त्याच्या कुटुंबाने दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब दिघे (रा. जोर्वे) यांनी गावातीलच दिगंबर भाऊसाहेब काकड या सावकाराकडून नऊ महिन्यांपूर्वी गाई घेण्यासाठी २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. दिघे यांनी व्याजाने घेतलेल्या पैशापोटी मुद्दल म्हणून २० हजार रुपये व त्याचे व्याज २० हजार रुपये असे ४० हजार हजार रुपये दिले होते. परंतु काकड याने आणखी १० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर १२ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दिघे हे आपला पुतण्या अक्षय दिघे याच्यासोबत मोटारसायकलवरुन रानमळा रस्त्याने कोल्हेवाडीकडे जात असतानाच दिगंबर काकड याची पत्नी जयश्री हिने मोटारसायकलला आडवे होऊन शिवीगाळ केली. नंतर तेथे दिगंबर काकड व त्याचा मुलगा ध्रुव हे आले व त्यांनी शिवीगाळ केली. दिगंबर काकड याने दिघे यांच्या मानेस धरून गाडीवरून ढकलून देत पाठीत रॉडने मारहाण केली. पुतण्या अक्षय दिघे यास ध्रुव काकड याने गोठ्याजवळ पडलेल्या लोखंडी दाताळाने उलट्या बाजूने पाठीत मारहाण केली. याप्रकरणी बाळासाहेब दिघे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून जयश्री दिगंबर काकड, दिंगबर भाऊसाहेब काकड व ध्रुव दिगंबर काकड (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sangamner Crime Jorvet, two were severely beaten

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here