धक्कादायक! पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Breaking News | Pune Crime: एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह (PSiI Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली.
पुणे: पुण्यात कोरेगाव पार्क येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. ७ मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पोलीसाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. हा घातपात आहे की हत्या या दृष्टीने पोलिस अधिक तपास करत आहेत.
दत्तात्रय कुरळे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पुणे पोलिस दलात मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका स्पा सेंटरच्या बाहेर त्यांचा मृतदेह आढळला होता. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या घटनास्थळी गेल्या. त्यांनी घटणस्थळांचा पंचनामा केला आहे. कुरळे यांच्या मृत्यूमागचे कारण गुलदस्त्यात असून त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर कुरळे यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचे कारण समोर येणार आहे, अशी माहिती पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Web Title: The Dead body of a police sub-inspector was found
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study