Home संगमनेर संगमनेर:  हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राडा

संगमनेर:  हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राडा

Breaking News | Sangamner: संगमनेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Hivargaon rain at the toll booth

संगमनेर: टोल नाक्याच्या वसूली वरुन आज (शुक्रवार) संगमनेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  मनैसनिकांनी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राडा केला.

संगमनेर तालुक्यातील नागरिकांना हिवरगाव पावसा टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी द्यावी या मागणीसाठी आज मनसेने टोल नाका येथे आंदोलन छेडले. मनसैनिकांनी पक्षाचे झेंडे हातात घेऊन टोल माफी मिळालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी मनसैनिकांनी टोल नाक्यावरील टोल सक्तीचे फलक फाडले. संगमनेर तालुक्यातील नागरिकांना टोल शुल्कमधून माफी द्यावी अशी मागणी मनसैनिकांनी टोल व्यवस्थापनाकडे केली. मनसेच्या आजच्या आंदोलनामुळे हिवरगाव पावसा टोल नाक्यावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता.

Web Title: Hivargaon rain at the toll booth

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here