अहमदनगर: आमिष दाखवून राहत्या घरात अत्याचार
Breaking news | Ahmednagar Crime: लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लॉज व तिच्या राहत्या घरात अत्याचार केल्याची घटना.
अहमदनगर: तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लॉज व तिच्या राहत्या घरात अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित तरूणीने याप्रकरणी रविवारी (दि. १०) रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणय किशोर पाखरे (वय २६ रा. नागरदेवळे ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सदरचा प्रकार फेब्रुवारी २०२२ पासून ते ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वेळोवेळी घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी तरूणी खासगी नोकरी करते. तिची प्रणय पाखरे सोबत ओळख झाली होती. त्याने तिला आपण लग्न करू असे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने फेब्रुवारी २०२२ ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी फिर्यादीवरून नगर पाथर्डी रस्त्यावरील एका लॉजवर व फिर्यादीच्या राहत्या घरात अत्याचार केला. दरम्यान फिर्यादी तरूणीने प्रणय याच्याकडे विवाहबाबत विचारणा केली असता त्याने विवाह करण्यास नकार दिला. आपली फसवणुक झाल्याचे फिर्यादी तरूणीच्या लक्ष्यात आल्यानंतर तिने १० मार्च रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून प्रणय पाखरे विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरसे तपास करत आहेत.
Web Title: Domestic abuse by baiting
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study