Home अहमदनगर अहमदनगर: तलवारी बाळगणारे दोघे जण अटकेत

अहमदनगर: तलवारी बाळगणारे दोघे जण अटकेत

Breaking News | Ahmednagar: पोलिसांच्या छाप्यात चार तलवारी जप्त.

Two persons carrying swords arrested

शेवगाव: धारदार तलवारी बाळगणाऱ्या दोन आरोपींना शेवगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील ४ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

विशाल संपत भाकरे (वय २३), संतोष अशोक घोंगडे (वय २५, दोघे रा. कोरडेवस्ती शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. अवैध धंद्यांवर कारवाई, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्याबाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने येथील दोन पोलिस पथके कारवाई करण्याच्या तयारीत होते. पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना शहरातील कोरडे वस्ती येथे दोन व्यक्ती तलवार बाळगत आहेत. तेथे गेल्यानंतर ते तलवारीसह मिळून येतील, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने छापा टाकून विशाल भाकरे व संतोष घोंगडे यांना शनिवारी (दि.९) ४ धारदार तलवारीसह अटक केली. पो. कॉ. शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Two persons carrying swords arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here