नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Akola: एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या. (Suicide)
अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. दोन शालेय शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक जाच होत असल्याने या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अल्तमेश बेग इमराण बेग असं आत्महत्या करणाऱ्या शालेय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो ज्या शाळेत शिकत होता तेथे त्याला मोठ्या प्रमाणावर मानसीक त्रास होता. दोन शिक्षक त्याला सतत मारहाण करायचे आणि मानसीक त्रास द्यायचे. या त्रासाला कंटाळून त्याने हा निर्णय घेतल्याचं पालकांनी म्हटलंय.
दरम्यान, अल्तमेश अकोला शहरातील खदान परिसरातील रहिवासी होता. त्याच परिसरातील गुरुनानक विद्यालयात तो शिक्षण घेत होता. या वर्षी तो ९ वीच्या वर्गात शिकत होता. काल शाळेत झालेल्या किरकोळ कारणांवरून अल्तमेशला शाळेतील दोन महिला शिक्षकांनी बेदम मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असं विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटलंय.
घडलेल्या प्रकारानंतर सायंकाळी अल्तमेश घरी परतला आणि शाळेतील घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. तेव्हा आई-वडिलांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सायंकाळी राहत्या घरातील वरच्या खोलीमध्ये तो अभ्यासासाठी जात असल्याचं सांगून गेला. रात्री बराच वेळ झाला तो खाली जेवणासाठी नं आल्यानं आई त्याच्याकडे गेली. पण त्यांना आपला मुलगा फासावर लटकलेला दिसला. या प्रकरणी खदान पोलिसांनी आत्महत्याप्रकरणी नोंद केली आहे. तसेच गुरुनानक शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जाणार असल्याचे खदान पोलिसांनी म्हटलं आहे.
Web Title: student of ninth grade committed suicide by hanging himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study