रेशन दुकानातून मिळाल्या फाटक्या साड्या, हीच का मोदी सरकारची गॅरंटी? संतप्त प्रतिक्रिया
Breaking News: साड्या फाटक्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याने सरकारने गरिबांची थट्टा चालवल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत.
रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या साड्या फाटक्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याने सरकारने गरिबांची थट्टा चालवल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी वाटपाचा निर्णय गाजावाजा करीत घेतला आहे. राज्यातील अत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडी वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी राज्य सरकार महामंडळाला साडयांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, साठवणूक, वणूक, हमालीसाठी खर्च देणार आहे. महामंडळास एका साडीसाठी 355 रुपये दिले आहेत. तर 2023-24 या वर्षाकरिता
या योजनेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात 86 रेशन दुकानांतून करण्यात आली. यात अंत्योदय योजनेच्या सात हजार 342 लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, यात अनेकै साड्या फाटक्या व जीर्ण अवस्थेत आहेत. अगदी टाकाऊ स्वरूपाच्या या साड्या आहेत, हीच का मोदीची गॅरंटी असा सवाल या महिला करत आहेत. त्यामुळे महिला रास्त दुकानातून साडी घेताना दुकानदाराशी वाद घालून साडी घेण्यास नकार देत आहेत. प्रशासन आणि जनता यामध्ये रास्त दुकानदार अडचणीत सापडला आहे.
रेशन दुकानदाराकडून देण्यात आलेली साडी फाटकी व जीर्ण अवस्थेत आहे. शासनाने गरिबांची चालवलेली ही थट्टा बंद करावी अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुखांनी दिली आहे. गरिबांच्या मदतीच्या नावाखाली सरकार जनतेची धूळफेक करीत आहे. साड्या वाटप हा भ्रष्टाचाराचा कळस आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शासनाने ही योजना पुढील पाच वर्षांसाठी लागू केली असून सणाच्या काळात महिलांना या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, योजनेच्या पहिल्याच वर्षी जीर्ण व फाटक्या साड्या मिळाल्याने ही योजना टिकेल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अशा जीर्ण आणि फाटक्या साड्या शासनाने वाटणे बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर जुमला करण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Web Title: torn sarees received from the ration shop, this is the Modi government’s guarantee
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study