नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा: दिनेश शहा.
सर्वोदय खिरविरेत १२वी च्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी: उदया येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. त्यामुळे नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा असे प्रतिपादन शालेय समितीचे सदस्य दिनेश शहा यांनी केले.
अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १२वी च्या कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी दिनेश शहा अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या प्रसंगि प्रमुख अतिथी माजी विक्रिकर उपायुक्त मारूती डगळे, नामदेव बेणके, विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत,प्रा.सचिन लगड,प्रा.विक्रम आंबरे,प्रा. रामदास डगळे,प्रा.संजय देशमुख,प्रा.वनिता बेंडकोळी, संगीता भांगरे, कविता वाळुंज, नानासाहेब शिंदे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश शहा पुढे बोलताना म्हणाले कि, भविष्यात राहीबाई पोपेरे, हर्षवर्धन सदगिर घडणे गरजेचे आहे. त्यासाठी जीव ओतुन काम करा. भवितव्याचा विचार समोर ठेवा. आवडेल तेथे करीअर करा. स्वतःच्या पायावर उभे रहा. नवीन निर्माण करा. कामातुन काम उभे करा.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मारूती डगळे यांनी शिक्षणाने ज्ञानात भर पडते, अनुभव येतो त्यातुनच माणुस मोठा होतो. त्यासाठी वेळेचे बंधन ठेवा. कारण वेळचे बंधन हेच यशाचे गमक आहे. गरीबीची लाज वाटू देऊ नका. गरीबीवर मात करा. कितीही मोठे व्हा. खुप शिका पण आई- वडील, शाळा, शिक्षक यांना कधीही विसरू नका. स्पर्धांमध्ये भाग घ्या.प्रमाणीकपणा जवळ बाळगा. प्रमाणीक गुण कधीही अपयशी ठरत नाही. असे प्रतिपादन केले.
विदयालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत यांनी हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, कोभाळणे यांचे दाखले समोर ठेऊन सकारात्मक विचाराने एकत्र येऊन भविष्य उज्वल करण्याचे अव्हान केले. तसेच बोर्ड परीक्षा संदर्भात योग्य त्या सुचना देऊन जे चांगले आहे ते आत्मसात करण्याचे मत प्रतिपादीत केले.
प्रा. सचिन लगड,प्रा.रामदास डगळे, प्रा.विक्रम आंबरे,प्रा. संजय देशमुख, प्रा.वनिता बेंडकोळी, कविता वाळुंज यांनीही विदयार्थ्यांना मार्गदर्शन करुन बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत कुलकर्णि यांनी पाठवलेल्या संदेशाचेही वाचन करण्यात आले.
विदयार्थ्यांनीही विदयालयाप्रती योग्य भावना व्यक्त करत विदयालयाचे नाव रोशन करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विदयार्थी हर्षल बेणके याने केले. तर नितीन बेणके याने उपस्थितांचे आभार मानले.
Website Title: News faith in duty than luck: Dinesh Shah