युवकांच्या छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीने युवकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना, जामखेड पोलिसांत दोन युवकांवर गुन्हा दाखल.
जामखेड: जामखेड शहरात रहात असलेल्या अल्पवयीन मुलीने युवकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ४) सकाळी घडली. या आत्महत्यास कारणीभूत असलेल्या दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शरद हनुमंत ढाळे व महादेव विष्णू ढाळे (रा. दोघे तेलंगशी, ता. जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अल्पवयीन मुलगी ही तीच्या जामखेड तालुक्यातील एका गावातील मामाकडे शिक्षणासाठी रहात होती. मामाकडे शिक्षण घेत आसतानाच गावातील आरोपी शरद ढाळे हा तीला वेळोवेळी त्रास देऊन छेडछाड करीत होता. तर त्याचा चुलत भाऊ महादेव ढाळे हा या मुलीला पळवून घेऊन जा असे सांगत छेड काढत होता. मुलीला हे युवक त्रास देत असल्याने वडिलांनी तीला पुणे येथील तीच्या मोठ्या बहिणीकडे राहण्यास पाठवले होते. मात्र हे युवक पुणे येथे मुलगी
रहात असलेल्या ठिकाणी येऊन त्रास देत होते. त्यामुळे सदर मुलीस पुन्हा जामखेड येथे आपल्या आई वडिलांकडे आणण्यात आले होते. यावेळी मुलगी ही मानसिक तणावामध्ये होती. सोमवार (दि. ४) सकाळी अकरा वाजता मुलीचे वडील बाहेर कामाला गेले होते. तर तीची आई घराच्या बाहेर भांडी घासत होती. यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
यानंतर मयत मुलीच्या बहिणीला पुणे येथे आपल्या घरी एका वहीत चिठ्ठी लिहुन ठेवली असल्याचे आढळून आले आहे. या चिठ्ठी मध्ये माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर यास मला त्रास देणारे जबाबदार असतील, असे लिहुन ठेवले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढाळे बंधुंविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती करत आहेत.
Web Title: Girl commits suicide after getting tired of being teased by youths
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study