Home अहमदनगर लग्नाला जात असताना अपघात ट्रॅकच्या चाकाखाली महिलेचा मृत्यू

लग्नाला जात असताना अपघात ट्रॅकच्या चाकाखाली महिलेचा मृत्यू

Breaking News |Ahmednagar Accident: महिला ट्रॅकच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू.

woman died under the wheel of an accident track while on her way to a wedding

कोपरगाव: कोपरगाव शहरातील बेट नाक्या जवळील नगर- मनमाड रस्त्यावर राजेंद्र रमेश सोळके हे आपल्या आईसोबत मोटारसायकल (क्रमांक एमएच १७ बीएन ४१६३) वरून कोपरगाव शिर्डी रस्त्यावरील संत जनार्दन स्वामी आश्रम जवळील भक्तनिवास याठिकाणी लग्नाला जात असताना मागून येणाऱ्या ट्रक (क्र. एमएच १४ एएस ७२७५) ने धडक दिल्याने मोटारसायकल वरील राजेंद्र सोळके बाजूने पडले तर सुमन रमेश सोळके या ट्रॅकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे या रस्त्यावरून जात असताना त्यांनी अपघात स्थळावरून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना भ्रमणध्वनी करून घटनेची माहिती दिली. तसेच अपघातात जखमी राजेंद्र सोळके यांना धीर देत रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली.

गेल्या अनेक वर्षांपासून नगर-मनमाड रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याने अनेक निवेदने , आंदोलन केल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम अतिशय संथगतीने चालू असल्याने रस्त्याचे काम होणे असून अडचण नसून खोळंबा असे चालले आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अपघातात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकांना अपंगत्व स्वीकारावे लागले. शासन अजून किती बळींची वाट पाहणार? आतातरी कामाची गती वाढवून लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे. मयत सुमन रमेश सोळके या शेतकरी सेवा संघाचे संचालक रामदास शिंदे यांच्या भगिनी असून संजीवनी एज्युकेशनचे विश्वस्त अमित कोल्हे यांचे विश्वासू निकटवर्ती विजय सोळके यांच्या मातोश्री आहेत. या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: woman died under the wheel of an accident track while on her way to a wedding

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here