आई… मला तरुणांनी मारलं, चिठ्ठी लिहून घेतला गळफास
Breaking News | Beed Crime: तणावात असलेल्या तरुणाने ‘आई… मला तरुणांनी मारलं’ अशी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.
बीड : दोन महिन्यांपूर्वी गावातील तरुणांनी केलेल्या मारहाणीत उजवा हात मोडला. त्यामुळे तणावात असलेल्या तरुणाने ‘आई… मला तरुणांनी मारलं’ अशी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना केज तालुक्यातील इस्थळ येथे शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. चैतन्य बाळासाहेब आपटे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने खिशात चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘आई… मला गावातील मुलांनी मारलं, म्हणून मी आत्महत्या
करतोय. याला जबाबदार वैभव शिंदे, राम शिंदे व खंडू बाबा आहेत. पोलिसांनी आपल्यासोबत न्याय केला नाही.’ असा मजकूर त्यात आहे. चैतन्यच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
उजवा हात मोडला
चैतन्य अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डेटा ऑपरेटर म्हणून कामाला होता. त्याचे दोन महिन्यांपूर्वी तरुणांसोबत भांडण झाले होते. यात उजवा हात मोडल्याने तो तणावात होता.
Web Title: Suicide by hanging by writing a note saying “Mother… I was killed by young people
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study