अहमदनगर: कॉलेज तरुणीने केली आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
राहुरी : तालुक्यातील चंडकापूर येथील पल्लवी सुनील जरे (वय १७) या कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि. २३) रोजी सकाळी घडली.
पल्लवी जरे चंडकापूर येथे तिच्या कुटुंबासह राहते. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून आज तिचा दुसरा पेपर होता. सकाळी नऊच्या दरम्यान पल्लवी हिने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या पश्चात आई-वडील, आजी, लहान भाऊ व चुलते असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
Web Title: College girl committed suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study