Home अकोले अकोलेत राजेद्र होंडा शोरूमला भीषण आग,२० लाखांचे नुकसान

अकोलेत राजेद्र होंडा शोरूमला भीषण आग,२० लाखांचे नुकसान

Breaking News | Akole: राजेद्र होंडा शोरुमला भीषण आग (Fire) लागल्याची घटना.

Rajedra Honda Showroom caught fire, loss of 20 lakhs

अकोले:  अकोले शहरातील नामांकित राजेद्र होंडा शोरुमला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत २० महागड्या दुचाकी गाड्या अंशतः तर काही गाड्या पुर्णतः जळून खाक झाल्या. तसेच सुमारे साडेपाच लाख रुपयांची रोकड या आगीत भस्म झाली. त्याचबरोबर महागडे फर्निचर, महागडे इलेक्ट्रिकल्स साहित्य असे सुमारे २० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संगमनेर व अकोले येथे सीए कैलास राजेंद्रप्रसाद सोमाणी व ओंकार सोमाणी यांच्या मालकीचे नामांकित श्री. राजेंद्र होंडा दुचाकी गाड्यांचे शोरूम आहे. यातील अकोले येथील शोरूमला मंगळवार २० रोजी सकाळी ६ वाजताचे सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीनंतर प्रचंड धूर निघू लागल्याचे लक्षात येताच तात्काळ आग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नाने ही भडकलेली आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानतर शोरुमच्या आतमध्ये जावुन पाहणी केली असता नुकसान झाल्याचे आढळून आले.

या आगीत साडेपाच लाखांची रोकडसह २० नवीन मोटारसायकल व फर्निचरचे आगीत जळुन प्रचंड नुकसान झाले. त्यात ६ लाकडी टेबल, १ लेदर सोफा, ९ प्लॅस्टिक खुर्ची, ४ कॉम्प्युटर सेट व प्रिंटर २, झेरॉक्समशिन २, इलेक्ट्रॉनिक वायरिंग, सिसिटिव्ही कॅमेरे ११ व कॅमेरा डिव्हिआर, सॅमसंग कंपनीचे ४ मोबाईल, मोटारसायकल ५ बॅटऱ्या, ईन्व्हर्टरच्या २ बॅटऱ्या, मोटारसायकलचे स्पेअरपार्ट, मोटारसायकलचे टायर, मोटारसायकलचे ऑईल, सेल्स डिपारमेंटची सिलींग व सिलींग लाईट २५, लिनिओ कंपनिचा लॅपटॉप, वॉल फैन ५, ईन्टरकॉम सिस्टिम व लॉनलाईन फोन – ४, एम्प्लीफायर १ व साऊँड ५, महत्वाचे कागदपत्र फाईल, शोरुमच्या वापरातील स्टेशनरी, गाड्यांच्या वाँरंटिचे नविन पार्ट, शोरुमची फर्ची, १४ मोटारसायकलचे पॅनल खराब झाले आहे. कैल्कुलेटर ३, कॅश काऊंन्टिंग मशिन वॉटर प्युरिफायर मशिन १, कॉफि मशिन-१, पाण्याची ३०० लिटरची टाकी, पुर्ण शोरुमची फिटिंग केलेली पाण्याची पाईप लाईन, मॅनेजर कॅबिनच्या उटफन काच, १ टेबल काच, ३, खिडक्यांच्या काचा, प्रथमदर्शनी असेलल्या १टफन, काच, बाथरुमधिल एक्झॉट फँन १, भिंतीवरील, डिजीटल वाँच, एम्प्लॉई युनिफॉम १५, ईलेक्ट्रीग टाईम अटेंन्डन मशिन, असेसरीज डिस्प्ले रँक २, हॅल्मेट ९, युपुएस ४, गाड्यांसाठीची असेसरीज, अॅल्युमिनियम चे पार्टीशयन, १एसी, डिव्हीडी प्लेअर – १. ग्राहकांसाठी असेलेले गिप्ट हॅन्ड घड्याळ, भिंतीचे घड्याळ, मोबाईल स्टॅन्ड, मनी, पॉकेट काही चावी किचन, ३ कापडी पडदे, १ नोटिस बोर्ट अन्य काही ऊपकरणे व वस्तु असे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे.  ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. याबाबत अकोले शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Rajedra Honda Showroom caught fire, loss of 20 lakhs

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here