सोनईत चर्चमध्ये बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Breaking News | Crime: एका चर्चमध्ये बारा वर्षांच्या मुलीवर चॉकलेटचे व पैशांचे आमिष दाखवून वृद्धाने लैंगिक अत्याचार (abused) केल्याची घटना.
सोनई: सोनई येथील एका चर्चमध्ये बारा वर्षांच्या मुलीवर चॉकलेटचे व पैशांचे आमिष दाखवून वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार (POSCO Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणारा आरोपीला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.
सोनई बेलेकर वाडी रोडवर असलेल्या एका चर्चमध्ये गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा घृणास्पद प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकरणामुळे सदर आरोपीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत गुरुवारी रात्री मोठा जमाव पोलीस ठाण्यावर जमला. यावेळी आरोपीला अटक करण्याची मागणी केली गेली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी या घटनेचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. या प्रकरणानंतर दोन गट पोलीस ठाण्यात समोर समोर आल्याने सोनई पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण तयार झाले होते. हिंदुत्ववादी संघटना व गावातील नागरिकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून दंगल नियंत्रण पथक व पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
शेवगाव उपविभागाचे पोलीस अधिकारी अनिल पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे यावेळी हजर होते. मुलगी अल्पवयीन असल्याकारणाने सोनई पोलीस अधिकाऱ्यांनी गुप्तता पाळली असून वृत्तपत्रांस गुन्हा रजिस्टर नंबर व आरोपीचे नाव देण्यास नकार दिला आहे.
Web Title: Twelve-year-old girl sexually assaulted in Sonai church
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study