Home संगमनेर संगमनेर: पतीसह सासू सासऱ्यास बेदम मारहाण; शिक्षक पत्नीसह भावावर गुन्हा दाखल

संगमनेर: पतीसह सासू सासऱ्यास बेदम मारहाण; शिक्षक पत्नीसह भावावर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime:  पतीने फारकतीची नोटीस पाठवल्याचा राग आल्याने पत्नी महिला शिक्षक ,तिचा भाऊ व आणखी दोघांनी सासू व सासरे यांना धांदरफळ बुद्रुक येथे त्यांच्या घरी जाऊन बेदम मारहाण केल्याची घटना.

Mother-in-law with husband brutally beaten crime filed

संगमनेर:  पतीने फारकतीची नोटीस पाठवल्याचा राग आल्याने पत्नी महिला शिक्षक ,तिचा भाऊ व आणखी दोघांनी सासू व सासरे यांना धांदरफळ बुद्रुक येथे त्यांच्या घरी जाऊन बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत शिक्षक गोरक्षनाथ कोल्हे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोरक्षनाथ साबळेराम कोल्हे हे शिक्षक असून धांदरफळ बु. येथील रहीवाशी आहेत. त्यांची पत्नी मंगल कोल्हे ही सासू सासरे व पती यांच्यापासून विभक्त राहते. त्यांचे संगमनेर न्यायालयात पती पत्नीचे कौटुंबिक वाद चालू असल्याने राग आल्याने धांदरफळ येथे घरी येऊन मारहाण केल्याप्रकरणी पती गुन्हा दाखल करण्यासाठी चालले असता पत्नी मंगल कोल्हे हिच्या चिथावणीवरून तिचा भाऊ रवींद्र गंगाधर गांगुर्डे, गोविंद डोंगरे व एक अनोळखी इसम यांनी  ९.३० च्या सुमारास शुक्रवार दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी रस्त्यावर जबर मारहाण केली. त्यामध्ये डोक्यावर, छातीवर व पोटात जोरजोरात ठोस मारले. त्यामध्ये पती गोरक्षनाथ कोल्हे जबर जखमी झाले तसेच सासू सासऱ्यांना पुन्हा धक्काबुकी करत शिवीगाळ केली. गोरक्षनाथ कोल्हे यांनी धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार घेतले होते.

याप्रकरणी गोरक्षनाथ कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी रवींद्र गंगाधर गांगुर्डे, गोबिंद डोंगरे व एक अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५८ भादवि ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल धनंजय महाले करत आहेत.

Web Title: Mother-in-law with husband brutally beaten crime filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here