अहमदनगर ब्रेकिंग! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा
Breaking News | Ahmednagar: फिर्यादी पत्नीच निघाली आरोपी; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काटा काढला असल्याचे तपासात उघड.
अहमदनगर | श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे कोयत्याने वार करून एकाची हत्या करण्यात आली होती. याबाबत पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात बेलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करत प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काटा काढला असल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे फिर्यादी पत्नीसह सहा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. आरती योगेश शेळके (वय २६), रोहित साहेबराव लाटे (वय २३, दोन्ही रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा), शोएब महंमंद बादशाह, रा. सेक्टर डी बाजार, कॅम्प पुणे), आयुष ah bust ir शंभूसिंह, पृथ्वीराज अनिल साळवे, अनिश सुरेंद्र धडे (तिन्ही रा. घोरपडे पेठ, पुणे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे. योगेश सुभाष शेळके या तरुणाची हत्या ३० जानेवारी रोजी धारदार कोयत्याने करण्यात आली होती. याबाबत मयताची पत्नी आरती योगेश शेळके यांनी बेलबंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन आजूबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता. परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे, तसेच त्याचे सोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले. फिर्यादी पत्नी आरती हिनेदेखील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगत पथकाची दिशाभूल केली. मात्र, गुन्हे शोधपथकाला याबाबत खात्री पटत नसल्याने पथकाने पुन्हा दोन दिवस कोथुळ गावात तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषणादरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे (वय २३, रा. कोथुळ, हल्ली मुक मुक्काम पुणे) याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आल्याचे दिसून आले. त्यानंतर पथकाने पुणे येथून लाटे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
ही कारवाई नमूद गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस कर्मचारी बबन मखरे, बापूसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, रवींद्र घुगांसे, मच्छिद्र बर्डे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, आकाश काळे, भाग्यश्री भिटे, सोनाली साठे, ज्योती शिंदे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांच्या पथकाने केली. १५ दिवसापूर्वी शिजला हत्येचा कट मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन पत्नी आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण करत असल्याने दोघांनी मागील १५ दिवसापूर्वी हत्येचा कट रचून अनिश सुरेंद्र धडे (रा. पुणे) याचे मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे, बिराज सतिश गाडे, शोएब महमंद बादशाह, आयुष शंभूसिंह यांना दीड लाख रुपये देण्याचे कबूल करुन त्यांचे मदतीने दोन दुचाकीवर त्यांच्यासह येऊन खून केल्याचे सांगितले. खुनासाठी सोशल मीडियाचा वापर रोहित व आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये, म्हणून स्नॅपचेंट या सोशल मीडीया वापर करुन ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते. तांत्रिक आधारासह पोलीसांनी सोशल मीडियाचा तपास करून गुन्ह्याची उकल केली आहे.
Web Title: With the help of her lover, the wife removed her husband’s thorn
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study