बाहेरच्या राज्यातील महिला आणून लॉजवर वेश्या व्यवसाय, पोलिसांचा छापा
Breaking News | Crime: लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसाय ठिकाणी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून एका पीडितेची सुटका. (Prostitution business on lodges)
मंगळवेढा | सोलापूर: मंगळवेढा-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर लेंडवे चिंचाळे हद्दीतील ज्ञानेश्वरी लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसाय ठिकाणी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून एका पीडितेची सुटका करून लॉज मालक अविनाश येडगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेंडवे चिंचाळे हद्दीत ज्ञानेश्वरी लॉजवर मालक तथा आरोपी अविनाश येडगे हा व्यवसायाकरिता महिला आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्याकरिता भाग पाडत असल्याची गोपनीय माहिती पोलीस
निरीक्षक बजरंग साळुंखे यांना समजताच ते दि. २९ रोजी दुपारी २.२० वाजता पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून वेश्याव्यवसायाची खातरजमा करण्यात आली. यावेळी आरोपी हा बाहेरच्या राज्यातील महिला आणून वेश्या व्यवसाय करण्यास त्यांना भाग पाडत असल्याची माहिती स्पष्ट झाली. यावेळी आरोपी हा प्रत्येक ग्राहकाकडून एक हजार रुपये घेऊन पीडितेस ५०० रुपये व स्वतःकडे ५०० रुपये ठेवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या छाप्याप्रसंगी त्या दिवशी १३ ग्राहक केले असल्याचीही माहिती चौकशीत समोर आली आहे.
Web Title: Prostitution business on lodges by bringing women from outside state, police raid
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study