Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीला पळून घेऊन जाऊन अत्याचार केल्याची घटना दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल.

minor girl was abducted and abused

पाथर्डी | Pathardi: एका अल्पवयीन मुलीला पळून घेऊन जाऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील शिराळ चिचोंडी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून संदीप राजेंद्र तागड व योगेश आटकर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. चिचोंडी, ता. पाथर्डी) या दोघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा पाथर्डी पोलिसांनी नोंदवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहावीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी ही चिचोंडी शिराळ येथे शिक्षण घेत आहे. दि. ३० रोजी रात्री १च्या सुमारास मुलीच्या आईच्या मोबाईलवर संदीप तागड याने फोन करून घराबाहेर बोलावले. त्या वेळी तागड याच्यासोबत अल्पवयीन मुलगी बोलत असताना संदीप तागड व योगेश आटकर यांनी बळजबरीने कार (एमएच १४ बीके ३६३) मध्ये टाकून पळवून घेऊन चिचोंडी गावात एका ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर संदीप तागड याने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर संदीप तागड मुलीला तिच्या घरी सोडवण्यास आला असता मुलीचे आई, वडील व सरपंच असल्याने त्याने कार तेथेच सोडून पळून गेला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहे.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

Web Title: minor girl was abducted and abused

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here