खळबळजनक! ठाकरे गटाच्या युवसेना शहर प्रमुखाचा चाकूने भोसकून खून
Breaking News | Crime: ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुखाची हत्या (Murder) करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.
चंद्रपूर : देशासह राज्याभरात प्रजासत्ताक दिनाचे उत्साही वातावरण असतानाच चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूरातील ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुखाची हत्या (Murder) करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 25-26 जानेवारीच्या मध्यरात्री घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. युवासेना शहरप्रमुख शिव वझरकरची रात्री उशिरा हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर या मित्राच्या कार्यालयाजवळच शिव वझरकरचा मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले.
युवासेना शहरप्रमुख असलेल्या शिव वझरकर आणि आणखी तिघांचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्या वादामुळेच त्यांनी शिव वझरकरला भोसकल्याचे पोलिसांनी समोर आले आहे. 25 जानेवारी रोजी शिवला तिघांनी बोलवून घेतले होते. बोलवलेल्या ठिकाणी शिव वझरकर आल्यानंतर त्याची भोसकून हत्या करण्यात आली. शिवची हत्या झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी परिसरात लावलेल्या वाहनांची आणि जेसीबीची तोडफोड केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
शिव वझरकरची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र पोलिसांनी काही तासात ही हत्या कोणी केली त्याचा तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी फरार झालेले आरोपी स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आस्कर या तिघांना पोलिसांनी रात्री अटक केली आहे. या हत्येचा तपास रामनगर पोलीस करत असून त्याची हत्या का करण्यात आली त्याचा पोलीस तपास करत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुख शिवा वझकर यांच्या झालेल्या हत्येच्या घटनेने चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली. तसेच त्यांचा मृतदेह एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. त्याचवेळी वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि वाहनांची तोडफोड केल्याने हे प्रकरण अधिक चिघळण्याचे संकेत पोलिसांना मिळाले. परिणामी पोलिसांनी या घटनेनंतर शहरातील अधिक बंदोबस्त वाढवत योग्य त्या उपाययोजना केल्या. त्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तसेच वझकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
Web Title: Murder Thackeray group’s Yuvsena city chief stabbed to death
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study