Home पुणे राज्यात थंडीचा कडाका कायम! किती दिवस जाणवणार थंडी

राज्यात थंडीचा कडाका कायम! किती दिवस जाणवणार थंडी

Weather Update: मुंबईचे किमान तापमान माथेरानपेक्षाही १ अंशाने कमी. (Cold weather)

Cold weather continues in the state! How long will you feel the cold

पुणे: गुलाबी थंडीने मुंबईत आल्हाददायक वातारण झाले असून, मंगळवारी मुंबईचे किमान तापमान माथेरानपेक्षाही १ अंशाने कमी नोंदविण्यात आले आहे. माथेरानमध्ये १५, तर मुंबईत १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

आणखी दोन दिवस मुंबई गारेगार राहणार आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल आणि किमान तापमान २० ते २२ अंशांवर जाईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. चालू मोसमात मुंबईत मंगळवारी नोंदविण्यात आलेले १४ अंश किमान तापमान म्हणजे आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे. यापूर्वी मुंबईचे किमान तापमान १६ व १५ अंश नोंदविण्यात आले आहे.

मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान १४, तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० म्हणजे दोन्हीही त्यांच्या सरासरी इतके किंवा त्यापेक्षा एखाद्या अंशाने कमी असू शकतात. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात दि. १ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भातील जिल्ह्यात दि. २४ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता आहे.

“उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यातील शहरांचे किमान तापमान खाली घसरत आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईत थंडी कायम राहील. नंतर मात्र किमान तापमान २० अंश नोंदविण्यात येईल. – सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग’

“दि. १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान १४, तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० म्हणजे दोन्हीही त्यांच्या सरासरी इतके किंवा त्यापेक्षा एखाद्या अंशाने कमी असू शकतात. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात दि. १ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भातील जिल्ह्यात दि. २४ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे थंडी कमी होईल. – – माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ’

राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअस मध्ये

जळगाव ९.६

नाशिक १०.१

नंदुरबार १०.९

पुणे ११.४

महाबळेश्वर ११.५

मालेगाव ११.६

अहमदनगर ११.७

सातारा १२

छ. संभाजीनगर १२.३

अलिबाग १३.७

सांगली १३.९

जेऊर १४

मुंबई १४.८

कोल्हापूर १५.१

डहाणू १५.३

माथेरान १५.८

जालना १७

रत्नागिरी १७.१

परभणी १७.२

पालघर १७.४

धाराशीव १८

सोलापूर १८

नांदेड १८.६

Web Title: Cold weather continues in the state! How long will you feel the cold

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here