Home अहमदनगर ब्रेकिंग: एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात संगमनेरच्या तिघांसह सहा...

ब्रेकिंग: एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात संगमनेरच्या तिघांसह सहा ठार

Breaking News  Ahmednagar Accident:  कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात, या अपघातात सहा जणांचा मृत्यू.

Six killed including three from Sangamner in horrific accident

अहमदनगर : कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे  2.30 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातात निलेश रावसाहेब भोर -देसवडे, प्रकाश रावसाहेब थोरात-वारणवाडी ( ता – पारनेर, जि. अहमदनगर ), अशोक चिमा केदार, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी (रा.जांबुत खुर्द, ता – संगमनेर, जि. अहमदनगर), सचिन कांतीलाल मंडलीचा-टाकळी मानूर ( ता- पाथर्डी, जि. अहमदनगर ) हे मयत झाले आहेत, तर भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एसटी चा पत्र लागल्याने सुयोग अडसूळ -जखमी देवेंद्र गणपत वाडेकर, व बद्रीनाथ विठ्ठल जगताप हे तिघेजण जखमी झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. त्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Six killed including three from Sangamner in horrific accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here