Home Competitive Exam संगमनेरच्या युवतीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून गैरवापर

संगमनेरच्या युवतीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून गैरवापर

Breaking News | Crime | Sangamner: युवतीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून मित्र व नातेवाईकांना मेसेज पाठवून बदनामी; सायबर पोलिसांत गुन्हा.

Sangamner girl's Instagram account hacked and misused

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील युवतीचे इंस्टाग्रामवरील अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर केल्याची घटना समोर आली आहे. . याप्रकरणी पीडित युवतीने सोमवारी (दि. १५) दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून येथील सायबर पोलीस ठाण्यात एका मोबाईल नंबर धारक अनोळखी व्यक्ती विरोधात भादंवि कलम ५०० सह आयटी अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना २८ सप्टेंबर २०२३ पूर्वी घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी युवती संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील असून त्या खासगी नोकरी करतात. त्यांचे इंस्टाग्रामवर अकाऊंट असून ते अकाऊंट अनोळखी व्यक्तीने हॅक करून पासवर्ड व ईमेल आयडी बदलला. त्या अकाऊंटवरून फिर्यादीचे मित्र व नातेवाईक यांना मेसेज पाठविले. फिर्यादीच्या फोटोचा वापर करून त्यामध्ये एका व्यक्तीचे नाव लिहून स्टोरी ठेवली. त्यामुळे फिर्यादीची व त्यांच्या कुटुंबाची बदनामी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान हा प्रकार २८ सप्टेंबर २०२३ पूर्वी घडली असला तरी फिर्यादी यांनी १५ जानेवारी २०२४ रोजी सायबर पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.

Web Title: Sangamner girl’s Instagram account hacked and misused

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here