दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम कायमचा बंद, काय आहे नवे धोरण
Breaking News: दोन वर्षांचा बी.एड. (विशेष शिक्षण) अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून केवळ चार वर्षाच्या बी.एड. अभ्यासक्रमाला मान्यता.
नवी दिल्ली : दोन वर्षांचा बी.एड. (विशेष शिक्षण) अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून केवळ चार वर्षाच्या बी.एड. अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल, असे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (आरसीआय) परिपत्रकात म्हटले आहे.
देशभरात सुरू असलेला दोन वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया ने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बीएड अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमांना आरसीआयकडून मान्यता देण्यात येते. आरसीआयने आपल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण देशातील सुमारे १००० संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू
रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाचे सचिव विकास त्रिवेदी यांनी हे परिपत्रकात जारी केले आहे. या परिपत्रकात नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम मध्ये चार वर्षांच्या इ. एव कार्यक्रमाची तरतूद केली. त्यामुळे आरसीआयनेही केवळ चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून आरसीआयकडून केवळ चार वर्षांच्या बीएड (विशेष शिक्षण) अभ्यासक्रमालाच मान्यता मिळणार आहे, असे म्हटले आहे.
बीएड शिक्षकांना अभ्यासक्रमामध्ये दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. ज्या संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक बीएड विशेष शिक्षण अभ्यासक्रम (एनसीटीईच्या चार वर्षांचा आयटीईपी अभ्यासक्रमासारखा) ऑफर करायचा असेल त्या पुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकतील असे आरसीआयने म्हटले आहे.
एनसीटीईने नवीन शैक्षणिक धोरण-२०२० (एनईपी) अंतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (आयटीईपी) चार वर्षांच्या बी.एड.ची तरतूद केली आहे. त्यामुळे आरसीआयनेही तसा निर्णय घेतला आहे.
येत्या सत्रापासून ४ वर्षाच्या अभ्यासक्रमालाच मान्यता मिळेल असे, आरसीआयचे सचिव विकास त्रिवेदी यांनी म्हटले आहे.
नव्या अभ्यासक्रमात काय?
■ बी.एड.च्या विशेष शिक्षण अभ्यासक्रमात दिव्यांग मुलांना शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. ■ श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व असलेल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो.
■ चार वर्षाचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील, असे आरसीआयने म्हटले आहे.
Web Title: A two-year B.Ed. The course is permanently closed
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News