Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

अहमदनगर ब्रेकिंग: तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Breaking  News | Ahmednagar: एका २४ वर्षीय तरुण महिलेवर वेळोवेळी अत्याचार (Rape) केल्याचा प्रकार.

Rape of young woman by luring her into marriage

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुण महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत संतोष बुन्हाडे, विशाल बुन्हाडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गुलमोहर रोड, सावेडी), राजीव शाही, बंटी (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेची प्रशांत याच्याशी ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. यातून महिलेला दिवस गेले. त्याने विश्वास संपादन करत डॉक्टरांकडून गर्भपात करून घेतला. त्यानंतर त्याने महिलेशी संबंध तोडले. याबाबत विचारणा केल्याने त्याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Rape of young woman by luring her into marriage

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here