शिक्षणाबरोबरच खेळाला देखील तेवढेच महत्त्व दिले पाहिजे: संपतराव नाईकवाडी
अकोले (विश्वास आरोटे): विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना शिक्षणाबरोबरच खेळाला देखील तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षक व पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संपतराव नाईकवाडी यांनी काल अकोले महाविद्यालय प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय भव्य खुल्या खो-खो स्पर्धा आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे होते, तर प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार हेमंत आवारी, शंभू नेहे, क्रिडा शिक्षक शिवाजी धुमाळ, भाऊसाहेब घेलवडे, शिवाजी चौधरी, नगरपंचायत बांधकाम सभापती अनिताताई चौधरी, अविनाश शेटे, बाबासाहेब आभाळे, अकोले महसुलचे तलाठी संतोष जाधव, क्रीडा शिक्षक सोपान लांडे, देवेंद्र आभाळे, मोहन कुसळकर यांसह अगस्ती विद्यालयाचे खो खो खेळातील माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत 25 ते 30 संघांनी सहभाग नोंदविला.
श्री.नाईकवाडी पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण संस्था चालकांनी शाळांमधून खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेवढं शिक्षणासाठी परिश्रम घेतले जातात, तेवढेच प्रयत्न मुलांच्या क्रीडा विकासासाठी देखील घेतले पाहिजेत. अगस्ती कला क्रीडा मंडळाने या स्पर्धा आयोजनातून एक आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खो – खो खेळाविषयी मोठी उत्सुकता आहे.
भविष्यकाळात या स्पर्धा तालुकास्तरीय मर्यादीत न राहता राज्यस्तरीय आयोजन केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी यापुर्वीही सातत्याने विविध स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर नाव चमकवले आहे, यापुढील काळात देखील प्रत्येक शाळा व संस्थांनी स्पर्धा आयोजनास सहकार्य करावे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुढील वर्षी प्रथम क्रमांकास रुपये 21 हजार, दुसरे बक्षीस 11 हजार व तिसरे बक्षिस रुपये 7 हजार अशी तीन बक्षिसे देण्याची घोषणा संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी यावेळी केली.
यावेळी या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडु व प्रेक्षकांनी गर्दी केली होती. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अगस्ती विद्यालयाचे शिक्षक राजु पवार यांनी केले. आभार प्रदर्शन सुयश डावरे, तन्मय हासे यांनी केले. सुनील शिंदे, सागर साळुंके, अभिषेक पिचड, संजय पवार, हरीश आंबरे, सुयश डावरे, तन्मय हासे, साहिल शेख आदींसह यावेळी 1993 साली विजेतेपद पटकाविणार्या खो खो टिमचे खेळाडू सहभागी झाले होते. यात कर्णधार अविनाश शेटे, मन्सुर सय्यद, सुनील नाईकवाडी, अनिल नाईकवाडी, अतुल शेटे, बाळु शेणकर, संतोष शेटे, राजेंद्र चौधरी, संचित कोटकर, अनिल नाईकवाडी, देवराम भोकनळ, राहुल धुमाळ, बाबाजी आरोटे, राहुल जगताप, रावसाहेब नवले, यांचा समावेत होता.
Website Title: Latest News sports should be given equal importance