Home महाराष्ट्र कोरोनाच्या नव्या व्हायरसने चिंता वाढवली, तिघांचा मृत्यू, वाढते रुग्ण धोक्याचा इशारा

कोरोनाच्या नव्या व्हायरसने चिंता वाढवली, तिघांचा मृत्यू, वाढते रुग्ण धोक्याचा इशारा

Coronavirus: कर्नाटकात 34 JN.1 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, तिघांचा मृत्यू झाला. तर, दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक.

new coronavirus has increased the concern, the death of three

Coronavirus In JN-1:  कोरोनाच्या नव्या जेएन १ व्हायरसने भारतातच नाही तर जगात पु्न्हा एकदा चिंता वाढवली आहे. भारतातही या व्हेरिएंटच्या बाधितांची  संख्या वाढू लागली आहे. सोमवारी, कर्नाटकात 34  JN.1 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, तिघांचा मृत्यू झाला. तर, दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात कोरोनाचे 115 नवीन बाधित आढळून आले आहेत. (Coronavirus News)

कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात JN.1 व्हेरिएंटची एकूण 34 प्रकरणे आढळून आली आहेत. नवीन JN.1 व्हेरिएंटबाधित तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 115 नवीन प्रकार आढळून आले आहेत. यासह राज्यातील कोविडच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1,749 वर पोहोचली आहे. मात्र, राज्यात गेल्या 24 तासांत या विषाणूमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

सोमवार 25 डिसेंबर रोजी राज्यात 28 नव्या रुग्णांचं निदान झालं. तसेच आतापर्यंत राज्यात JN1 व्हेरियंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आलेत. त्याचप्रमाणे आज 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर हा 1.81 टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात एकूण 134 सक्रिय रुग्ण असल्याचं सांगण्यात आलंय. भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. JN.1 या कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटने भारताचीच नाही तर जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 प्रकाराबाबत सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे.

Web Title: new coronavirus has increased the concern, the death of three

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here