मुलीला पळवून अत्याचार, घरात डांबून, व्हिडीओ काढून दिले सोडून
Crime News: मुलीला पळवून नेण्यात आले. तिच्यावर अत्याचार करून तिचे व्हिडीओ काढून सोडून देण्यात आल्याचा प्रकार. (abducted and abused)
धुळे: राज्यात अत्याचाराच्या घटनांत तीव्र घटना घडताना दिसत आहेत. यातच धुळे येथून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. तिच्यावर अत्याचार करून तिचे व्हिडीओ काढून सोडून देण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी चाळीसगाव रोड पोलिसात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळ्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. तिला घरात डांबून ठेवण्यात आले होते. तिचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला मारहाण करण्यात आली. हा प्रकार धुळ्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे घडला. अत्याचाराची ही घटना ११ जुलै २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलगी धुळ्यातील घरी निघून आली.
Web Title: girl was abducted and abused and kept in the house, and the video was removed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App